Ad will apear here
Next
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘सवाई’ला सुरुवात

पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, बुधवार, ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. 

गेली सहा दशके ही प्रथा सुरू असून, दर वर्षी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी या ठिकाणी जमतात आणि सवाई गंधर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करीत असतात. 

‘६० च्या दशकात आचार्य अत्रे व तत्कालीन महापौर नाना गोरे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. तेव्हापासून महोत्सव सुरू होण्याच्या दिवशी सकाळी या पुतळ्याला हार अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली,’ अशी आठवण या वेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZSRCH
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘सवाई गंधर्व’ महोत्सवात झंकारले सरोद-सतारचे सूर पुणे : केडिया बंधूंचे सतार आणि सरोद सहवादन, पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुरेल संतूरवादन आणि संदीप भट्टाचारजी, मंजिरी आलेगावकर यांच्या सुस्वर गायकीने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना तृप्त केलं.
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language